सरकारचा ULLU, ALTTसह २५ अ‍ॅप्सवर घणाघात; अश्लील कंटेंटमुळे बंदीचा निर्णय

25 Jul 2025 19:56:37
 
Govt Ban ULLU ALTT
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
डिजिटल माध्यमांमधून वाढत चाललेल्या अश्लीलतेवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं कडक पावलं उचललं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं २५ मोबाईल अ‍ॅप्सवर तातडीने बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये ULLU, ALTT, Big Shots, Desiflix आणि Boomex यांसारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.
 
या अ‍ॅप्समार्फत सातत्याने असभ्य, अश्लील आणि सेन्सॉरशिवाय सामग्री प्रसारित केली जात असल्याचं मंत्रालयाच्या निदर्शनास आलं आहे. विशेष म्हणजे, या अ‍ॅप्सकडून वयोमर्यादेची कोणतीही शहानिशा केली जात नव्हती आणि अल्पवयीन प्रेक्षकांना उद्देशून सामग्री दाखवली जात होती, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
सरकारने सांगितलं की, या अ‍ॅप्सनी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० आणि सायबर सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवत समाजात नैतिक आणि मानसिक अधःपतन घडवत असल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.
 
अशा अ‍ॅप्समुळे युवकांवर नकारात्मक परिणाम होत असून, भविष्यातही अशा अ‍ॅप्सविरोधात अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा सरकारने दिला आहे.
Powered By Sangraha 9.0