(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान भारताला मोठा झटका बसला आहे. संघाचा उपकर्णधार आणि प्रमुख यष्टीरक्षक ऋषभ पंतला (Rishabh Pant) दुखापतीमुळे मालिकेच्या पुढील सामन्यांतून माघार घ्यावी लागली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
ऋषभ पंतला नेमकी काय दुखापत झाली?
सामन्याच्या ६८व्या षटकात ख्रिस वोक्सचा चेंडू रिव्हर्स स्वीप करताना थेट पंतच्या उजव्या पायावर आदळला. त्यानंतर त्याच्या पायातून रक्त वाहू लागलं आणि सूज देखील आली. वेदना असह्य झाल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं आणि रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.
ईशान किशनला मिळणार ‘बिग ब्रेक’?
पंतच्या अनुपस्थितीमुळे संघात दुसऱ्या यष्टीरक्षकाची गरज निर्माण झाली असून, ईशान किशनला संधी दिली जाण्याची शक्यता वाढली आहे. अलीकडील सामन्यांत किशनने केलेल्या कामगिरीमुळे निवडकर्त्यांचा विश्वास त्याच्यावर आहे.
पहिल्या दिवसाच्या खेळावर नजर-
इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. भारताची सलामी जोडी यशस्वी ठरली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने ९४ धावांची भागीदारी करत मजबूत सुरुवात दिली. राहुल ४६ तर जयस्वाल ५८ धावांवर बाद झाला. शुभमन गिल केवळ १२ धावा करून बाद झाला. साई सुदर्शनने ६१ धावांची दमदार खेळी केली. दिवसअखेर रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर नाबाद राहिले.
पंतच्या अनुपस्थितीत भारताच्या यष्टीरक्षणाबरोबरच मधल्या फळीतील ताकदही कमी होणार आहे. त्यामुळे ईशान किशनला मिळणारी संधी निर्णायक ठरू शकते.