(Image Source-Internet)
मुंबई :
प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या आणि चर्चेत राहणाऱ्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss) चा १९वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यंदाचा हा सीझन पारंपरिक चौकटीत न बसता, तब्बल ५ मोठ्या बदलांसह नव्या स्वरूपात सादर होणार आहे. सलमान खान पुन्हा एकदा सूत्रसंचालन करणार असला तरी या सीझनमध्ये काही नव्या चेहऱ्यांचीही एंट्री होणार आहे.
‘बिग बॉस चाहते हैं…’ आवाज होणार इतिहासजमा-
गेल्या कित्येक सीझनपासून प्रेक्षकांच्या कानावर सतत पडणारा “बिग बॉस चाहते हैं…” हा लोकप्रिय संवाद यंदा ऐकायला मिळणार नाही. त्याऐवजी “बिग बॉस जानता चाहते हैं…” असा नव्या धाटणीचा संवाद वापरण्यात येणार आहे. या बदलामुळे शोच्या टोनमध्ये मोठा फरक जाणवण्याची शक्यता आहे.
घर चालवण्याचं स्वातंत्र्य आता स्पर्धकांकडे-
यंदा बिग बॉस घरामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. रेशनचे नियोजन, कामांची विभागणी, जबाबदाऱ्या ठरवणं हे सर्व निर्णय स्पर्धकच घेणार आहेत. यामुळे घरात वाद, गोंधळ आणि राजकीय डावपेच अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
दोन वेगळ्या थीम्स – ‘राजकीय’ आणि ‘रिबाउंड’-
सीझन १९ मध्ये ‘Political’ आणि ‘Rebound’ अशा दोन थीम्स ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसारच स्पर्धकांची निवड होणार असून, राजकीय किंवा पूर्वी चर्चेत असलेले, तसेच वादग्रस्त ठरलेले स्पर्धक या सीझनमध्ये झळकतील.
सलमानसह तिघे नवे होस्ट्स-
या वर्षी सलमान खानसोबत करण जोहर, फराह खान आणि अनिल कपूर हे तिघेही शोचे सूत्रसंचालक असतील. हे तीन होस्ट्स शोच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपली भूमिका पार पाडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक आठवड्यात नवा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
स्पर्धक निवडही थीमनुसारच-
शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक ही निवड थीमनुसार केली जाणार आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मधील वादग्रस्त स्पर्धक अपूर्वा मुखीजाशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय मनोरंजन, समाजकार्य, राजकारण क्षेत्रातील गाजलेली आणि चर्चेत असलेली व्यक्तिमत्त्वं बिग बॉस १९ मध्ये झळकण्याची शक्यता आहे.
शोच्या तयारीला अंतिम टप्पा-
२० ऑगस्टपर्यंत बिग बॉस सेटचं काम पूर्ण होणार असून, २८ ऑगस्टला सलमान खानचा प्रोमो शूट केला जाणार आहे. त्यानंतर २९ ऑगस्टला स्पर्धकांच्या डान्स परफॉर्मन्सचं शूटिंग पार पडेल. त्यानंतर शोची ऑन-एअर तारीख अधिकृतरीत्या जाहीर होणार आहे.