(Image Source-Internet)
नागपूर :
शहरातील आय.सी. चौकाजवळील शासकीय मुलींच्या वसतिगृहात रविवारी मध्यरात्री घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात युवकांनी वसतिगृहात शिरकाव करत एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
पीडित विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्यामुळे आरोपी पळून गेले. पळताना ते तिचा मोबाईल हिसकावून घेऊन गेले, अशी माहिती मिळाली आहे. ही विद्यार्थिनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून वसतिगृहात वास्तव्यास होती.
या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वसतिगृहात सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याचं उघड झालं आहे. यासोबतच पोलिसांकडूनही वेळेवर योग्य ती कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसह अनेक सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.