उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाची शक्यता व्यक्त!

    22-Jul-2025
Total Views |

Uddhav Thackeray wishes Devendra Fadnavis
(Image Source-Internet)
मुंबई :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुभेच्छा देताना त्यांच्या राजकीय प्रवासाचं विशेष कौतुक केलं आहे.
 
‘महाराष्ट्र नायक’ या गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून प्रकाशित होणाऱ्या पुस्तकासाठी लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांबाबत सकारात्मक मत मांडलं आहे. "गंगाधरराव फडणवीस यांनी जसा स्वच्छ आणि लोकहितवादी राजकारणाचा आदर्श ठेवला, त्याच मार्गावर चालत देवेंद्र फडणवीस पुढे जात आहेत," असं त्यांनी नमूद केलं.
 
2014 ते 2019 या कालखंडातील सहकार्य आठवताना ठाकरे म्हणाले, "त्यांची प्रशासनावरची पकड, मुद्द्यांवरचा अभ्यास आणि कामाचा उत्साह अनुभवता आला."
 
फडणवीस यांनी राबवलेल्या ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सारख्या योजनांचा विशेष उल्लेख करत, "त्यामुळे राज्यात गुंतवणुकीला चालना मिळाली आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल झाले," असं ठाकरे यांनी म्हटलं.
 
ते पुढे म्हणाले, "फडणवीस हे दूरदृष्टी असलेले, तडफदार आणि निर्णयक्षम राजकारणी आहेत. भविष्यात त्यांना केंद्रस्तरावरही जबाबदारी मिळेल, अशी मला खात्री आहे."
 
शेवटी, ठाकरे यांनी त्यांना "भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा" देत त्यांच्या राजकीय भूमिकेचं भरभरून कौतुक केलं.