शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    22-Jul-2025
Total Views |
 
Shiv Sena MLA Chandrakant Patil
 (Image Source-Internet)
 
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इंदूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या असून, योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं आहे.
 
या आंदोलनात चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने बळजबरीने केळीचं पीक उध्वस्त केल्याने शेतकरी संतप्त झाले होते. त्यांनी जलसमाधी आंदोलनही केलं.
 
२२ जुलै रोजी आमदार पाटील शेतकऱ्यांसोबत ठिय्या आंदोलनात सामील झाले. घोषणाबाजी आणि संताप वाढल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार पाटील आणि काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यांना भुसावळ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.
 
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, सरकारवर शेतकरी विरोधी भूमिका घेतल्याचे आरोप होऊ लागले आहेत.