दोषी ठरलो तर देईन राजीनामा;रमी वादावर माणिकराव कोकाटेंचे स्पष्टीकरण

22 Jul 2025 14:16:10

Manikrao Kokate
 
मुंबई :
विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत आलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अखेर पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी रमी खेळल्याचा आरोप फेटाळून लावत, आपण दोषी आहोत हे सिद्ध झाल्यास राज्यपालांकडे थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.
 
कोकाटे म्हणाले की, संबंधित मोबाईल फोन नवीन होता आणि सभागृहात असताना त्यांनी OSD कडून माहिती घेण्यासाठी तो मागवला होता. मोबाईल उघडल्यावर अचानक रमीसदृश अ‍ॅपचे पॉप-अप स्क्रिनवर आले आणि त्याला स्कीप करण्याचा प्रयत्न केला. "केवळ ११ सेकंदाचा तो व्हिडीओ आहे, पण संपूर्ण क्लिप दाखवली असती तर माझ्यावरचे आरोपच निष्प्रभ ठरले असते," असं त्यांनी स्पष्ट केलं.
 
आपल्याकडे ना कोणतं रमी अ‍ॅप आहे, ना बँक खाते त्याला जोडलेलं आहे, असं सांगत कोकाटे म्हणाले की, मला रमी खेळताच येत नाही, आणि मी कधीही अशी अ‍ॅप वापरलेली नाही.
 
राजकीय हेतूनं बदनामीचा डाव रचला जात असल्याचा आरोप करत, कोकाटे म्हणाले, “मी कोणत्याही तपासाला सामोरा जाण्यास तयार आहे. परंतु जे नेते खोटे आरोप करत आहेत, त्यांच्यावर मी न्यायालयात कारवाई करणार आहे.”
 
एक छोटा मुद्दा घेत विरोधकांनी राजकारण केलं जातंय. हा मुद्दा मुद्दामहून फुगवला गेला. मी जर चुकीचा ठरलो, तर कोणताही आदेश न येताच मी स्वतःहून पद सोडण्यास तयार आहे,असं स्पष्ट वक्तव्य कोकाटे यांनी केलं आहे.
 
Powered By Sangraha 9.0