विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; नागपूरसह पाच जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याचा अलर्ट

    22-Jul-2025
Total Views |
- नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे

Heavy rain(Image Source-Internet) 
मुंबई :
विदर्भातील काही भागांत हवामान विभागाने मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा दिला आहे. अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि जोरदार मेघगर्जना यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या ३ तास विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, काही भागांत पावसाचा जोर अधिक असू शकतो. त्यामुळे वृक्ष, वीजवाहक तारा कोसळण्याचा धोका असून, नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
सतर्कतेसाठी प्रशासनाची सूचना
उघड्या जागांपासून आणि झाडांच्या खाली थांबण्याचे टाळा
विजेपासून सुरक्षित अंतर ठेवा
अनावश्यक प्रवास टाळा
अधिकृत सूचना आणि अपडेट्सकडे लक्ष ठेवा
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्कात राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.