(Image Source-Internet)
नागपूर :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी, २२ जुलै रोजी ईमेलद्वारे बॉम्ब (Bomb) असल्याची धमकी मिळाल्याने खळबळ माजली. ही माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने तात्काळ खबरदारीचे उपाय सुरू केले, तर पोलिस दलही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
धमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात श्वानपथक आणि बॉम्ब शोध पथक तैनात करण्यात आले. प्रत्येक भागाची काटेकोर तपासणी सुरू असून, आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
सुरक्षा उपाय म्हणून काही काळासाठी विमानतळ परिसरात सामान्य नागरिकांची हालचाल नियंत्रित करण्यात आली. दरम्यान, कोणताही धोका दिसून न आल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
धमकी नेमकी कोठून आली आणि कोणत्या उद्देशाने पाठवण्यात आली, याचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि सायबर यंत्रणा तपास करत आहेत. सध्या विमानसेवा आणि उड्डाणे नेहमीप्रमाणे सुरू आहेत.