(Image Source-Internet)
मुंबई :
११ जुलै २००६ रोजी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या सात बॉम्बस्फोटांप्रकरणी मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयाने सोमवारी मोठा निर्णय दिला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आणि विशेष न्यायालयाने दोषी ठरवलेल्या १२ आरोपींना हायकोर्टाने निर्दोष जाहीर करत त्यांच्या सुटकेचे आदेश दिले.
या घटनेत १८९ जणांचा मृत्यू झाला होता आणि ८०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. आरोपींनी जवळपास १८ वर्ष तुरुंगात काढले. त्यातील काहींना मृत्युदंड, तर काहींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
हायकोर्टाने नमूद केलं की, आरोपींविरुद्ध पुरावे ठोस नव्हते. तपासात अनेक त्रुटी आढळल्या. साक्षीदारांचे जबाब, सापडलेली वस्तू, आणि आरोपींची ओळख यात सुसंगती नव्हती.बचाव पक्षाने दाखवून दिलं की, काही आरोपींना जबरदस्तीने कबुली दिल्याचे सांगायला लावण्यात आले. कोर्टानेही हे लक्षात घेत त्यांना निर्दोष ठरवलं. या निकालामुळे तपास करणाऱ्या एजन्सींच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.