अरोमा फ्लावर्स: फुलांच्या सजावटीपासून गिफ्टिंगपर्यंत एकाच ठिकाणी सर्व सुविधा

    02-Jul-2025
Total Views |
 Aroma Flowers
 
नागपूर:
फुलं म्हणजे सौंदर्य, भावना आणि प्रसन्नता यांचे प्रतीक. प्रत्येक खास प्रसंगी फुलांना एक अनोखे स्थान असते. हेच सौंदर्य आणि भावनेचे मिश्रण नागपूरच्या मनिष नगरमधील अरोमा फ्लावर्स या प्रतिष्ठित फ्लोरिस्ट शॉपमध्ये अनुभवायला मिळते. गेल्या २५ वर्षांपासून फुलांच्या व्यवसायात कार्यरत असलेला हा ब्रँड आज उन्नती रननावरे यांच्या नेतृत्वात अधिक आधुनिक आणि पर्यावरणपूरक स्वरूपात विकसित झाला आहे. अरोमा फ्लावर्स केवळ एक फुलांचे दुकान नसून हे फुलांशी संबंधित सर्व प्रकारची सेवा पुरवणारे One-stop solution आहे.
 
इंजिनिअरिंगमधून उद्योजिकेकडे प्रवास:
 
उन्नती रननावरे या मूळच्या सिव्हिल इंजिनिअर असून त्यांनी कॉर्पोरेट नोकरीचा मार्ग सोडून आपल्या पालकांच्या स्वप्नांना बळ दिले. पारंपरिक फुलांच्या व्यवसायात त्यांनी नव्या कल्पना, सुविधा आणि सेवा दिल्या. आज अरोमा फ्लावर्स हे केवळ एक फुलांचे दुकान नसून फ्लोरल डिझाईन, इव्हेंट डेकोरेशन आणि गिफ्टिंग सोल्यूशनसाठी एक संपूर्ण केंद्र बनले आहे.
 
अरोमा फ्लावर्समध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सेवा मिळतात:
 
फ्लोरल अरेंजमेंट्स
चविष्ट केक्स आणि सजवलेले प्लांटर्स
होलसेल आणि रिटेल दरातील ताज्या फुलांची विक्री
लग्न, वाढदिवस, बेबी शॉवर, हळदी-मेहेंदी, प्रपोजल इव्हेंट, कॉर्पोरेट इव्हेंट्स व थीम पार्टीसाठी सजावट
बलून डेकोरेशन, फ्लोरल अ‍ॅक्सेसरीज, ज्वेलरी, हार
गिफ्टिंग हॅम्पर्स आणि आकर्षक पॅकेजिंग
 
अरोमा फ्लावर्सची वैशिष्ट्ये:
 
वेळेवर आणि दर्जेदार सेवा
कोल्ड स्टोरेजची सुविधा
फक्त नैसर्गिक व ड्राय फुलांचा वापर, कोणतेही प्लास्टिक अथवा आर्टिफिशियल फुलं नाही
२ तासांत जलद डिलिव्हरी
नेचर कलर्सवर आधारित दुकानाची सजावट
सस्टेनेबल आणि इको-फ्रेंडली गिफ्टिंग व पॅकेजिंग
 
स्थानिकांच्या विश्‍वासाचा केंद्रबिंदू :
 
आज अरोमा फ्लावर्स हे मनिष नगर परिसरात एक विश्वासार्ह नाव बनले आहे. ग्राहकांच्या भावना समजून घेत प्रत्येक डिझाइनमध्ये त्यांचे प्रतिबिंब उमटवणे हेच या ब्रँडचे ब्रीद आहे. या दुकानाची संपूर्ण थीम नेचर कलर्स वर आधारित असून, सस्टेनेबल आणि इको-फ्रेंडली गिफ्टिंग व पॅकेजिंग या तत्वांवर ते ठाम आहे. सध्या अरोमा फ्लावर्स ही सेवा मनिष नगरमध्ये उपलब्ध आहे. फुलांमधून भावना पोहोचवणाऱ्या आणि कोणत्याही खास प्रसंगाला अविस्मरणीय बनवणाऱ्या सेवा हव्याच असतील, तर अरोमा फ्लावर्स हा सर्वोत्तम पर्याय आहे.