नागपूर सेंट्रल जेलमध्ये पुन्हा हिंसाचार; एक कैद्याचा दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला

    19-Jul-2025
Total Views |
 
Nagpur Central Jail
 (Image Source-Internet)
नागपूर : 
नागपूर सेंट्रल जेलमधील (Nagpur Central Jail) कैद्यांमधील वाद विकोपाला जात असून बुधवारी पुन्हा एकदा अति क्रूर प्रकार समोर आला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर जीवघेणा हल्ला करत त्याच्या गुप्तांगावर दातांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
 
सकाळी सुमारे २.३० च्या सुमारास जेलच्या मोठ्या गोल बैरकमध्ये हा प्रकार घडला. माहितीप्रमाणे, न्यायप्रविष्ट कैदी शुभम ठाकूर झोपेत असताना कृष्ण रमेश तिवारी या कैद्याने त्याला मोठ्या आवाजात उठवले. झोपमोड झाल्याने चिडलेल्या शुभमने त्याला चापट मारली, त्यानंतर वाद उफाळून दोघांत तुंबळ मारामारी झाली.
 
या झटापटीदरम्यान कृष्ण तिवारीने अमानुष कृत्य करत शुभमच्या गुप्तांगावर चावा घेतला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. शुभमच्या वेदनादायक किंकाळ्या ऐकून सुरक्षा रक्षक विनोद कचडे यांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
 
जखमी शुभम ठाकूरला तातडीने जेलमधील वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात कृष्ण रमेश तिवारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.