शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; जयंत पाटील यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर निर्णय

    15-Jul-2025
Total Views |
 
Shashikant Shinde
 (Image Source-Internet)
मुंबई :
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आता माजी मंत्री शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची निवड करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती, मात्र अखेर शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भात घोषणा खुद्द खासदार शरद पवार यांनी केली.
 
वाय बी चव्हाण केंद्रात पार पडलेल्या पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे आणि अन्य प्रमुख नेते उपस्थित होते.
 
बैठकीदरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता, जो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर औपचारिक घोषणा करण्यात आली.
 
आता शिंदे यांच्यासमोर आगामी महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाचे यश सुनिश्चित करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
 
जयंत पाटील यांच्या जागी शिंदे यांची निवड पक्षातील आगामी डावपेचांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे, असा राजकीय वर्तुळात सूर आहे.