महाराष्ट्रात वाहन करात मोठा बदल; सीएनजी, डिझेल, पेट्रोल गाड्या आजपासून महागणार

    01-Jul-2025
Total Views |
 
vehicle tax
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्यात १ जुलै २०२५ पासून नव्या वाहन कर (Vehicle tax) प्रणालीचा अंमल सुरू झाला आहे. यामुळे सर्व प्रकारच्या गाड्यांची ऑनरोड किंमत वाढणार आहे. विशेषतः सीएनजी व डिझेल वाहनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला अधिक झळ बसेल.
 
राज्य सरकारने खासगी सीएनजी आणि एलपीजी गाड्यांवरील एकदाच आकारल्या जाणाऱ्या करात १ टक्क्याने वाढ केली आहे. उदाहरणार्थ, १० लाख रुपयांच्या सीएनजी गाडीवर आता ७० हजारांऐवजी ८० हजार रुपये कर द्यावा लागेल. २० लाखांच्या वाहनावर १.४ लाखांऐवजी आता १.६ लाख रुपये भरावे लागणार आहेत.
 
महागड्या वाहनांवर कराचा भार वाढवण्यात आला असून मोटार वाहन कराची कमाल मर्यादा २० लाखांवरून ३० लाख रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे. यामुळे २० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या गाड्यांसाठी अतिरिक्त कर भरणे अनिवार्य होणार आहे.
 
पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर वाहनाच्या किमतीनुसार वेगवेगळे टक्केवारीत कर आकारले जातील. पेट्रोल गाड्यांसाठी हा कर ११ ते १३ टक्क्यांदरम्यान तर डिझेलसाठी १३ ते १५ टक्क्यांदरम्यान राहणार आहे.
 
मालवाहू वाहनांवर आधी वजनाच्या आधारावर कर आकारला जात होता, परंतु आता तो गाडीच्या किमतीच्या ७ टक्के इतका निश्चित करण्यात आला आहे.
 
या नव्या बदलांमुळे सरकारला येत्या आर्थिक वर्षात सुमारे १७० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल, तर बजेट आता थोडं वाढवावं लागेल!