नागपुरात आता ट्राफिक नियम तोडल्यास महागात पडणार; AI तंत्रज्ञानामुळे लगेच चालान

09 Jun 2025 21:11:11
 
AI technology
 (Image Source-Internet)
नागपूर :
शहरात ट्राफिक नियम तोडणाऱ्यांसाठी आता चुकांची माफी नाही. नागपूर शहरात आता AI तंत्रज्ञानावर आधारित इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम (IITMS) बसवण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे नियम मोडताच लगेच तुमच्या मोबाईलवर चालान पोहोचणार आहे.
 
शहरातील लक्ष्मीनगर, बजाज नगर, शंकर नगर, अजित बेकरी, अलंकार चौक, कांचीपुरा चौक, दीक्षाभूमी, श्रद्धानंद चौक, अभयनगर चौक आणि एलएडी कॉलेज चौक या प्रमुख ठिकाणी आता नियम तोडणे सहज शक्य होणार नाही. या सिग्नल्सवर लावलेले स्मार्ट कॅमेरे नियम उल्लंघन करणाऱ्यांची ओळख पटवून, मानवी हस्तक्षेपाविना थेट चालान जारी करतील.
 
कोणते नियम मोडल्यास होईल कारवाई?
सिग्नल जंप करणे
चुकीच्या बाजूने वाहन चालवणे
वेगमर्यादा ओलांडणे
सीट बेल्ट न लावणे
 
या प्रत्येक उल्लंघनावर AI कॅमेरा वाहनाच्या नंबर प्लेटवरून ओळख करून चालान पाठवेल.
 
या नव्या तंत्रज्ञानामुळे आणखी एक मोठा फायदा होणार आहे — ग्रीन कॉरिडॉर मॅनेजमेंट. म्हणजेच, अवयव प्रत्यारोपणासारख्या आपत्कालीन प्रसंगी रस्ता आपोआप मोकळा केला जाईल.
 
तर आता नागपूरच्या रस्त्यांवर वाहन चालवत असताना नियम तोडल्यास सावध व्हा. कारण AI तुमच्यावर सातत्यानं लक्ष ठेवून आहे.
Powered By Sangraha 9.0