नागपुरात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या; पोलिसांची गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

05 Jun 2025 19:56:42
 
Two arrested
 (Image Source-Internet)
नागपूर :
शहरात सुरु असलेल्या 'ऑपरेशन थंडर' मोहिमेंतर्गत अंमली पदार्थविरोधी लढ्याला वेग येत असून, जरीपटका परिसरात मेफेड्रोन (MD) ड्रग्ज विक्री करत असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
चावला चौकात दोन संशयित तरुण एमडी ड्रग्ज घेऊन ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार तातडीने कारवाई करत पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून नितेश विखानी आणि आकाश केवलरमानी या दोघांना पकडले.
 
तपासात त्यांच्या ताब्यातून ५ ग्रॅम एमडी ड्रग्ज व दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. जरीपटका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सांगितले की, हे दोघे काही काळापासून ओळखीच्या व्यक्तींना हे अमली पदार्थ पुरवत होते.
 
पोलिसांनी या दोघांवर लक्ष ठेवून ही कारवाई उघडकीस आणली आहे. अटक केलेल्या आरोपींनी हे ड्रग्ज कुठून आणले, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरु आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीवर आघात झाल्याचे मानले जात आहे.
Powered By Sangraha 9.0