नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठी उलथापालथ: सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी

04 Jun 2025 15:31:47
 
Sudhakar Badgujar
 (Image Source-Internet)
नाशिक :
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये मोठी उलथापालथ घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही घोषणा नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली, ज्यावेळी खासदार संजय राऊत यांचा फोन आला आणि बडगुजर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
सुधाकर बडगुजर यांनी संघटनात्मक बदलांवर नाराजी व्यक्त केली होती आणि पक्षविरोधी कारवायांची गंभीर आरोप केली होती. त्यांच्या या वागणुकीमुळे पक्षशिस्तीचा उल्लंघन झाल्याचे पक्षनेत्यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत यांच्या फोननंतरच बडगुजर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
या घटनेमुळे नाशिकमधील ठाकरे गटात अंतर्गत मतभेद उघड झाले असून, स्थानिक राजकारणावर याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या उलथापालथीचे राजकीय पडसाद उमठू शकतात.
 
सुधाकर बडगुजर यांना पक्षातून हकालपट्टी केल्याने ठाकरे गटाच्या स्थानिक संघटनात्मक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
Powered By Sangraha 9.0