मनपाची संकल्पना;नागपुरातील लता मंगेशकर उद्यानात होणार अॅडव्हेंचर पार्क

    04-Jun-2025
Total Views |
- ८.७९ कोटींची प्रशासकीय मंजुरी

Lata Mangeshkar Park(Image Source-Internet) 
नागपूर :
नागपूर शहरातील विद्यार्थ्यांना साहसिक खेळांचा अनुभव देण्यासाठी आणि त्यांच्यात धाडसाची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने (NMC) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सूर्यनगर येथील लता मंगेशकर उद्यानात तब्बल ८ कोटी ७९ लाख १६ हजार ६९४ रुपयांच्या खर्चाने ‘अॅडव्हेंचर पार्क’ उभारण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमाला मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
 
लता मंगेशकर उद्यानातील जुने ऑडिटोरियम स्टेडियम पाडून आवश्यक जागा रिकामी करण्यात आली असून, सुमारे २ एकर क्षेत्रफळ साहसिक खेळांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. येथे १५ वेगवेगळ्या प्रकारचे अॅडव्हेंचर गेम्स उभारले जाणार असून, यासाठी विशेष प्रावधान करण्यात आले आहे.
 
पार्कच्या उभारणीसाठी आर्थिक आराखडा:
निर्माण आणि हरितीकरणासाठी – 4.58 कोटी
अॅडव्हेंचर गेम्ससाठी – 4.20 कोटी
एकूण – 8.79 कोटी
या प्रकल्पांतर्गत वायरींग, कुंपण घालणे, नवीन रस्ते, कार्यालय व तिकीटघर, स्मार्ट शौचालय, लॉन आणि सजावटी वृक्ष लावण्याचे काम केले जाणार आहे.
 
पार्कमधील मुख्य अॅडव्हेंचर गेम्स:
झिप लाइन (सिंगल रोप वन वे)
अॅडव्हेंचर प्ले स्टेशन
लो रोप कोर्स
क्लाइंबिंग वॉल
रॅपलिंग वॉल
स्काय सायकल (डबल)
स्काय रोलर (डबल)
बंजी इजेक्शन
सस्पेन्शन ब्रिज, कॅनोपी वॉक व बर्मा ब्रिज
ट्रॅम्पोलिन पार्क आणि सॉफ्ट प्ले एरिया
बंद शेडसह सॉफ्ट प्ले क्षेत्र
मोठा झोका
नेट क्लाइंबिंग
रोप क्लाइंबिंग
स्लिपरी वॉल
 
ही योजना नागपूर शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणार असून, तरुण पिढीला फिटनेस, साहस व मनोरंजनाचा उत्तम पर्याय उपलब्ध करून देणार आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.