'लाडक्या बहिणीं'साठी आनंदाची बातमी; दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता

    30-Jun-2025
Total Views |
 
ladaki bahein yojana
 (Image Source-Internet)
मुंबई :
मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' (Ladaki bahein yojana) योजनेतून दर महिन्याला महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतात. मात्र, जून महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेक लाभार्थींमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर आता दिलासा देणारी माहिती पुढे आली आहे.
 
सध्या चर्चा आहे की, जून आणि जुलै या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाऊ शकतात. त्यामुळे एकूण ३००० रुपये मिळण्याची शक्यता आहे. ही रक्कम आषाढी एकादशीच्या सुमारास म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
 
या योजनेअंतर्गत आतापर्यंत ११ हप्त्यांचे पैसे म्हणजे एकूण १६,५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता १२वा आणि १३वा हप्ता मिळाल्यास एकत्रित ३००० रुपयांचा लाभ होणार आहे. त्यामुळे योजनेचा आधार घेणाऱ्या महिलांसाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.
 
अद्याप शासनाकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी काही ठोस संकेत मिळत असल्यामुळे महिलांनी आपली बँक खाती तपासत राहणं गरजेचं ठरणार आहे. रक्कम वेळेत मिळणे हेच या योजनेचं मुख्य वैशिष्ट्य असून, अनेक महिलांसाठी हा निधी गरजेच्या वेळी उपयोगी पडतो.