सरकारविरोधात विरोधकांचे "मी मराठी" आंदोलन,पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात दणाणून सोडल्या!

30 Jun 2025 14:00:33
 
Monsoon session
 (Image Source-Internet)
मुंबई:
महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याने झाली. ३० जून रोजी विरोधकांनी "मी मराठी" (Mee Marathi) अशा टोप्या घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी या आंदोलनात भाग घेतला, आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना "मी मराठी" टोपी घालून दिली.यावेळी आदित्य ठाकरे आणि बावनकुळे यांच्यात सौहार्दपूर्ण हस्तांदोलनही झाले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात छगन भुजबळ यांचा परिचय करुन दिला, तर २०२५-२६ च्या आर्थिक वर्षाच्या पुरवणी मागण्याही मांडल्या जातील. यावेळी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाशी संबंधित अध्यादेशही सादर करण्यात येणार आहे.
 
विरोधकांच्या आक्रमक सुरुवातीमुळे आगामी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे, आणि उद्धव ठाकरे देखील विधानभवनात दाखल होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0