हिंदी सक्तीच्या वादात विद्या बालनची खास प्रतिक्रिया; मराठी लूकमध्ये रील शेअर करत दिला भाषेला मान

27 Jun 2025 20:37:32

Vidya Balan(Image Source-Internet)  
मुंबई :
राज्यात शाळांमधील हिंदी सक्तीच्या निर्णयावरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने एक वेगळीच भूमिका घेतली आहे. तिने मराठी भाषेतील एक विनोदी रील शेअर करून भाषेविषयीचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे, या रीलसाठी तिने पारंपरिक मराठमोळा ग्रामीण वेशभूषा परिधान केला असून, तिचा हा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
 
भाऊ कदम यांच्या डायलॉगवर आधारित रील-
विद्या बालनने हा रील प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम यांच्या संवादावर आधारित केला आहे. तिने यामध्ये इरकल साडी, पारंपरिक दागिने आणि साधा मेकअप करत ग्रामीण स्त्रीचा भावपूर्ण अविष्कार साकारला आहे. रील शेअर करताना तिने लिहिलं आहे – "ही वेळ मराठी भाषेत रील करण्याची आहे, कारण मी सध्या एका मराठी चित्रपटासाठी शूटिंग करत आहे."
 
View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

" /> 
 
‘राजा शिवाजी’ चित्रपटासाठी सुरू आहे तयारी-
विद्या बालन सध्या रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. या सिनेमात ती महत्त्वाची भूमिका साकारणार असून, चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, जेनेलिया देशमुख यांसारख्या कलाकारांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा भव्य चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
भाषेवर प्रेम व्यक्त करणारी कलात्मक अभिव्यक्ती-
राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या मुद्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलं असताना, विद्या बालनने केलेली ही कलात्मक अभिव्यक्ती भाषेच्या सन्मानाचं प्रतीक ठरत आहे. तिने रीलच्या माध्यमातून मराठी भाषेवर असलेलं प्रेम आणि आदर दाखवला असून, तिच्या या भूमिकेला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
 
विद्या बालनचा हा अभिनय आणि लूक केवळ कलात्मकतेचाच नव्हे, तर संवेदनशील सामाजिक भाष्य म्हणूनही पाहिला जात आहे.
Powered By Sangraha 9.0