हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी हात मिळवला; एकत्र मोर्चाची तयारी, संजय राऊतांची घोषणा

27 Jun 2025 13:05:52
 
Sanjay Raut
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीने लादण्याच्या निर्णयाविरोधात जनआंदोलनाचे स्वरूप घेणाऱ्या लढ्याला आता नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्वं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या मुद्द्यावर एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.मनसेच्या वतीने आधीच एकत्रित मोर्चा काढण्याची प्रस्तावना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासमोर ठेवण्यात आली होती. दोन स्वतंत्र मोर्चे न काढता एकच आणि एकजूट असा लढा उभारण्याचा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता.संजय राऊतांचे संकेत, एकत्रिततेची चाहूलशिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल प्लॅटफॉर्मवर एक ट्विट करून मोठा खुलासा केला.
 
महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल,” असं त्यांनी ठामपणे म्हटलं. त्यासोबतच त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटोही पोस्ट करत राजकीय चर्चांना नवा उधाण दिला.या ट्विटनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.
 
मोर्च्याची नवी तारीख – ५ जुलैसुरुवातीला ६ जुलै रोजी मोर्चा होणार असल्याचं जाहीर झालं होतं, मात्र आता ५ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर मराठी अस्मितेसाठी लोक एकत्र येणार असून, या लढ्याचं नेतृत्व राज आणि उद्धव ठाकरे एकत्र करताना दिसू शकतात.राजकीय नेत्यांची परखड मतं-राज ठाकरे यांनी यापूर्वी स्पष्टपणे म्हटलं होतं, “मराठीच्या मुद्द्यापेक्षा माझा अहंकार मोठा नाही.
 
तर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, “महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी जो उभा राहील, तो आमचा सहकारी आहे.”शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या पार्श्वभूमीवर मत मांडताना सांगितले, “आज मराठी माणसाच्या एकतेची गरज आहे. जात, पक्ष, विचार बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे.”दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही ठाम भूमिका घेतली. हिंदी सक्तीमुळे मराठी भाषेच्या अस्तित्वावर गदा येतेय. म्हणूनच आता एकजूट होणं अत्यावश्यक आहे, असं ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0