नागपूर मनपाचा अनुपस्थित स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, पुन्हा पाच जणांवर कारवाई

    26-Jun-2025
Total Views |
 
NMC
 (Image Source-Internet)
नागपूर :
लक्ष्मीनगर झोनमधील वार्ड क्रमांक १६ मधील सोमलवाडा हजेरी स्टँडवर अनुपस्थित आढळलेल्या पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांवर नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. याआधीही कामावर अनुपस्थित राहणाऱ्या ९६ स्वच्छता कर्मचाऱ्यांवर मनपाने कारवाई केली होती.
 
मान्सून पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छतेसंदर्भात दक्ष राहण्यासाठी वसुमना पंत स्वतः विविध हजेरी स्टँडवर अचानक पाहणी करत आहेत. सोमलवाडा स्टँडवर एकूण २१ स्वच्छता कर्मचारी असताना, पाहणी दरम्यान केवळ १६ कर्मचारी उपस्थित होते, तर ५ कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर होते.
 
या स्थितीवर वसुमना पंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांना, जर हे कर्मचारी उत्तर देण्यात अपयशी ठरले, तर त्वरित शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.शहरातील स्वच्छतेला बाधा न होता कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, अन्यथा कठोर कारवाई अटळ,असे वसुमना पंत म्हणाले