(Image Source-Internet)
मुंबई :
कॉमेडीच्या दुनियेत आपलं अढळ स्थान निर्माण करणारा कपिल शर्मा (Kapil Sharma) ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नव्या पर्वामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्याच भागात सलमान खानची उपस्थिती, नवज्योत सिंग सिद्धूंचं पुनरागमन आणि नेहमीसारखाच हास्याचा धमाका यामुळे शोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
मात्र सध्या सर्वाधिक गाजतंय ते कपिल शर्माला मिळणाऱ्या मानधनावरून. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, एका एपिसोडसाठी कपिलला मिळणारी रक्कम तब्बल 5 कोटी रुपये असल्याची चर्चा आहे. प्रत्येक सिझनमध्ये 13 भाग असल्याने एका सिझनची कमाई 65 कोटींपर्यंत जाते, आणि तीन सिझनचा मिळून कपिलचा गल्ला 195 कोटींवर पोहोचतो.
या शोमध्ये अर्चना पूरण सिंग, सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक यांचाही सहभाग आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष वेधून घेतोय तो कपिलचा यशस्वी आणि कमाईने झळाळणारा प्रवास.
एकेकाळी केवळ 500 रुपये मानधन घेणारा कपिल, आज 300 कोटींपर्यंतची संपत्ती जमवणारा सेलिब्रिटी बनला आहे. लॉकडाऊननंतर त्याने फिटनेसवर भर दिला असून, 11 किलो वजन कमी करत त्याने स्वतःला नव्यानं घडवलं.
मंचावरील त्याचं आत्मविश्वासपूर्ण हास्य आणि मेहनतीचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय.