कामठीत अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली; पालकमंत्री बावनकुळेंसह पोलिस आयुक्त उपस्थित

    21-Jun-2025
Total Views |
 
Anti drug awareness rally
 (Image Source-Internet)
नागपूर :
नागपूर पोलिसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत कामठी परिसरात एक भव्य अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅलीचे (Anti drug awareness rally) आयोजन करण्यात आले. या रॅलीत नागपूरचे पालकमंत्री आणि पोलिस आयुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
या कार्यक्रमात परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त, विविध धर्मीय नेते, सामाजिक संस्था आणि सुमारे ८०० ते १००० नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या रॅलीचा मुख्य उद्देश समाजात नशामुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे आणि विशेषतः युवकांना या विघातक सवयींपासून दूर ठेवणे हा होता.
 
या वेळी पालकमंत्र्यांनी 'ऑपरेशन थंडर' मोहिमेचे कौतुक करत नागपूर पोलिसांच्या कार्यशैलीचे खास उल्लेख करून अभिनंदन केले. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, "नशेविरुद्धच्या या लढाईत प्रत्येकाने पुढे येऊन कामठीला नशामुक्त बनवण्यासाठी हातभार लावावा."
 
रॅलीद्वारे समाजाला एक ठोस संदेश देण्यात आला की, अमली पदार्थ हे एक सामाजिक संकट आहे आणि याविरुद्ध केवळ पोलिसच नाही, तर प्रत्येक नागरिकाने सजग होऊन सामूहिक लढा दिला पाहिजे. नागपूर पोलिसांची ही उपक्रमशीलता स्थानिक नागरिकांनीही भरभरून स्वागत केले असून, नशामुक्त समाजाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.