नागपूरच्या ४२६ झोपडपट्टीधारकांना मिळाले घर आणि मालकी हक्क; लक्ष्मीनगरचे 'श्रमिक नगर'मध्ये रूपांतर

19 Jun 2025 22:03:59
 
slum dwellers
 (Image Source-Internet)
नागपूर :
नागपूरमध्ये (Nagpur) अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर आणि मालकी हक्क देण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला असून, त्याअंतर्गत ४२६ झोपडपट्टीधारकांना घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ४२६ झोपड्यांपैकी लक्ष्मीनगरमधील झोपडपट्टीचे संपूर्ण रूपांतर झाले असून, आता या परिसराचे नाव 'श्रमिक नगर' असे ठेवण्यात आले आहे.
 
या निर्णयामुळे झोपड्यांमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नागरिकांना 'रमाई आवास योजना'अंतर्गत, तर आदिवासी समाजातील नागरिकांना 'शबरी आवास योजना'अंतर्गत घरे मिळाली आहेत. इतर घटकांतील नागरिकांना 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत घर मिळाले आहे. कोणताही व्यक्ती घराशिवाय राहू नये, यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
 
घर मिळवलेल्या रामदास वुईके यांनी सांगितले की, लक्ष्मीनगर प्रभागाचे नगरसेवक असताना देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टीतील समस्यांकडे वारंवार लक्ष वेधले. महापौर झाल्यानंतर त्यांनी या भागातील सुविधा प्राधान्याने सुरू केल्या. या झोपडपट्टीमध्ये एका शाळेसाठी जागा आरक्षित होती. १९९९ नंतर आमदार झाल्यावर त्यांनी ही अडचण दूर करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) कडे पाठपुरावा केला. मात्र, तोडगा न निघाल्यामुळे त्यांनी थेट एनआयटी कार्यालयात आंदोलनही केले होते, असे सिटी डेव्हलपमेंट अलायन्सचे वासनिक यांनी आठवण करून दिली.
 
हा निर्णय झोपडपट्टीवासीयांसाठी केवळ निवारा नव्हे, तर सन्मान, स्थैर्य आणि उज्वल भविष्य घेऊन येणारा आहे.
Powered By Sangraha 9.0