कोच्चीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी;नागपूरला इंडिगो फ्लाइची आपत्कालीन लँडिंग

17 Jun 2025 12:50:00
 
Bomb threat
 (Image Source-Internet)
नागपूर :
कोच्चीहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटला बॉम्बने (Bomb) उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने लँडिंग करण्यात आलं. विमानात एकूण १५७ प्रवासी व क्रू सदस्य होते.इंडिगोची फ्लाइट क्रमांक 6E 2706 सकाळी 9.20 वाजता कोच्चीहून दिल्लीसाठी रवाना झाली होती.
 
थोड्याच वेळात पायलटला बॉम्बसंदर्भात धमकी मिळाली. त्यांनी तात्काळ नागपूर एटीसीशी संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. परवानगी मिळताच विमान सुरक्षितपणे नागपूर विमानतळावर उतरवण्यात आलं.घटनेनंतर विमानतळावर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
 
बम शोध पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आलं असून, संपूर्ण विमानाची बारकाईने झडती घेतली जात आहे. सध्या तरी कोणताही स्फोटक पदार्थ सापडलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या प्रकारामुळे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. मागील आठवड्यात अहमदाबाद विमानाच्या घटनेनंतर देशभरात हवाई सुरक्षेबाबत अतिरिक्त दक्षता घेतली जात आहे.
Powered By Sangraha 9.0