FATF कडून पाकिस्तानला फटकार; पहलगाम हल्ल्यावरून भारताच्या भूमिकेला जागतिक पाठिंबा!

16 Jun 2025 22:12:24
 
FATF
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसून येत आहे. FATF (Financial Action Task Force) ने या हल्ल्यासाठी आर्थिक पुरवठा झाल्याचे स्पष्ट संकेत देत पाकिस्तानला फटकारलं आहे.
 
२२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केली होती.
 
FATF नं म्हटलं आहे की, अशा हल्ल्यांमागे शक्तिशाली आर्थिक यंत्रणा असते आणि ती रोखण्यासाठी सोशल मीडिया, क्रिप्टो व्यवहार, बँकिंग यंत्रणा यांच्यावर कठोर नियंत्रण गरजेचं आहे.
 
दरम्यान, ब्राझीलमध्ये पार पडलेल्या ११व्या BRICS संसदीय फोरममध्येही भारताच्या भूमिकेला पाठिंबा देत हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0