(Image Source-Internet)
अहमदाबाद :
एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या AI-171 या विमानाचा अहमदाबादजवळ (Ahmedabad) झालेला अपघात संपूर्ण देशाला हादरवून गेला आहे. या दुर्घटनेत विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले आणि प्रचंड स्फोट झाला. विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या अपघातानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनेही या घटनेवर दु:ख व्यक्त करत सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
रितेश देशमुखची शोकभावना-
रितेशने ट्विटरवर लिहिलं, अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबद्दल ऐकून मोठा धक्का बसला. या दुर्घटनेत प्रभावित झालेल्या सर्व प्रवासी, कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांप्रती माझ्या संवेदना. या कठीण काळात माझ्या प्रार्थना त्यांच्या सोबत आहेत.
विमान कोसळल्याची ठिकाण आणि वेळ-
AI-171 हे विमान गुरुवारी, १२ जून रोजी दुपारी १:३८ वाजता अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या दिशेने उड्डाण घेत होते. काही वेळातच ते मेघानीनगर भागात कोसळले, जो भाग विमानतळापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे.
विमान दिल्लीहून आलं होतं-
ही फ्लाईट दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादला आली होती आणि पुढे लंडनसाठी निघाली होती. मात्र, टेकऑफनंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाडामुळे ती कोसळली.
आगीचा भडका आणि बचाव कार्य सुरू-
अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे अधिकारी जयेश खडिया यांनी सांगितले की, घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दल पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.