भारत-पाक संघर्षात नागपूरच्या ‘नागास्त्र’चा जबरदस्त प्रभाव; पाकिस्तानात हाहाकार!

09 May 2025 19:29:20
 
Nagpur Nagastra
 (Image Source : Internet)
नागपूर :
‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) च्या दरम्यान भारताने केलेल्या जोरदार ड्रोन हल्ल्यात, नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीजने विकसित केलेल्या ‘नागास्त्र’ ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. या कारवाईत ‘नागास्त्र’ने आपली क्षमता सिद्ध करून भारतीय लष्करासाठी एक विश्वासार्ह अस्त्र ठरले आहे.
 
या घडामोडीनंतर सोलार इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल म्हणाले की, "भारतीय सैन्याला आमच्या बनवलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा होतो, ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे."
 
डिसेंबर २०२४ मध्येच ‘नागास्त्र-१’ भारतीय लष्कराच्या सेवेत अधिकृतपणे दाखल झाले होते. हे पाऊल संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे मानले जाते.
 
पंतप्रधान मोदींनीही सोलार युनिटला दिली भेट-
३० मार्च २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमधील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडला भेट दिली. यावेळी लोइटरिंग म्युनिशनसाठी विकसित केलेल्या टेस्टिंग रेंज आणि रनवेचे उद्घाटन करण्यात आले. मोदींनी यावेळी ‘नागास्त्र-३’ या अत्याधुनिक कामिकेज ड्रोन सिस्टिमचे प्रत्यक्ष डेमोही पाहिले.
 
‘नागास्त्र’ची वैशिष्ट्ये –
१०० किमी पर्यंत मारक क्षमता
सतत ५ तास उड्डाण करण्याची क्षमता
गुप्त हल्ल्यास सक्षम – शत्रूला माहिती न होता लक्ष्य ध्वस्त करण्याची ताकद
थेट व्हिडीओ फीडिंगची सुविधा
पॅराशूटद्वारे सुरक्षित परत आणण्याची सोय
Powered By Sangraha 9.0