‘ऑपरेशन सिंदूर’वर टीका करणे पडले महागात; नागपूरमध्ये केरळच्या पत्रकाराला अटक

09 May 2025 15:15:02
 
Kerala journalist
 (Image Source : Internet)
नागपूर:
सोशल मीडियावर भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी केरळमधील पत्रकार रेजाज एम. शिबा सिद्दीकी याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर देशविरोधी विचार पसरवल्याचा आणि जनतेमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा आरोप आहे.
 
रेजाज हा ‘डेमोक्रेटिक स्टुडंट्स असोसिएशन’ या संघटनेशी जोडलेला असून, ‘मक्तूब मीडिया’ आणि ‘दि ऑब्झर्व्हर पोस्ट’ यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तो सातत्याने लिहित होता. पोलिसांनी सांगितले की, त्याने इंस्टाग्रामवर भारतीय लष्कराच्या कारवायांवर टीका करत त्या कारवायांना ‘मानवतेविरोधी’ ठरवले होते.
 
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लकडगंज परिसरातील एका हॉटेलमध्ये राहत असलेल्या रेजाजवर कारवाई करण्यात आली. अटकेवेळी त्याच्याकडून काही वादग्रस्त पुस्तके, माओवादी साहित्य आणि अन्य संशयास्पद वस्तू सापडल्या.
 
दिल्लीहून परत येताना तो नागपूरमध्ये एका मित्राला भेटायला थांबला होता. गुप्तचर विभागाने त्याच्यावर याआधीपासून लक्ष ठेवले होते. अटक केल्यानंतर त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, नागपूर पोलिस आणि अँटी-नक्षल सेल त्याच्याकडून चौकशी करत आहेत.
Powered By Sangraha 9.0