(Image Source : Internet)
नवी दिल्ली :
भारताच्या (India) ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीला पाकिस्तानने आणखी तीव्रतेने पेटवत अचानक हल्ल्याची मालिका सुरू केली. मात्र, भारतीय लष्कर आणि वायुसेना सतर्क असतानाच त्यांनी तात्काळ आणि आक्रमक प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या लष्करी महत्त्वाच्या ठिकाणांवर अचूक हल्ले चढवले.
लाहोर, सियालकोट, फैसलाबादवर लक्ष्य – भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या लाहोर, सियालकोट आणि फैसलाबाद या शहरांवर लक्ष्य साधत अत्यंत अचूक आणि नियोजित हवाई हल्ले केले. यामध्ये पाकिस्तानची अत्याधुनिक AWACS (Airborne Warning and Control System) यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली.
रात्रभर क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारताचा पाणी सोडणारा बचाव –
गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून जैसलमेर परिसरात ७० हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालीमुळे हे सर्व हल्ले निष्फळ ठरवण्यात यश आले.
तीन लढाऊ विमाने पाडली, एक वैमानिक- ताब्यात – भारतीय वायुदलाने केलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची दोन JF-17 Thunder आणि एक F-16 लढाऊ विमाने पाडण्यात आली. या मोहिमेत एका पाकिस्तानी वैमानिकाला जिवंत ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे.
भारत सज्ज, सर्व सुरक्षा यंत्रणा अॅक्टिव्ह मोडवर-
भारतभर सुरक्षा यंत्रणा सतर्क असून कोणत्याही प्रकारच्या कुरापतीस तोंड देण्यासाठी सज्ज आहे. भारत सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की, देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही कारवाईला कधीही आणि कुठेही जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.
ही घटना सध्या दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय राजनैतिक आणि लष्करी हालचालींना चालना देत असून संपूर्ण जगाचे लक्ष या संघर्षाकडे वेधले गेले आहे.