भारतीय सैन्याची पुन्हा मोठी कारवाई; लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिमवर केला हल्ला!

08 May 2025 16:03:51
 
defense system in Lahore
(Image Source : Internet) 
नवी दिल्ली:
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेला जबर झटका दिला आहे. शस्त्रसंधीचा भंग करत पाकिस्तानने अमृतसर परिसरात मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने तत्काळ प्रत्युत्तर देत लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिमवर अचूक हल्ला केला.
 
‘ऑपरेशन सूर्यास्त’नंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. त्याच्या या कुरापतींना चोख उत्तर देत, भारतीय सैन्याने लाहोरजवळील महत्त्वाची रडार आणि संरक्षण व्यवस्था निष्क्रिय केली आहे. भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे पाकिस्तानची हवाई संरक्षण ताकद मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे.
 
सध्या, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि भारतीय लष्कर अत्यंत सतर्क असून, पुढील कोणतीही हालचाल रोखण्यासाठी सीमा भागात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारतीय सेनेच्या या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला ठाम इशारा दिला गेला आहे.
Powered By Sangraha 9.0