नागपुरातील कोराडी नाक्यावर 'वाई' आकाराचा बनणार उड्डाणपूल; वाहतुकीच्या समस्यांना दिलासा

07 May 2025 20:07:58
 
Y shaped flyover
 (Image Source : Internet)
नागपूर :
उपराजधानी नागपूरच्या एनएच ४७ वर कोराडी नाक्यावर (Koradi Naka) वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वाई (Y) आकाराचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या कामाला २० जूनपासून सुरुवात होणार असून, ८ महिन्यांत ते पूर्ण होईल.
 
या उड्डाणपुलामुळे कोराडी नाक्यावरचा ‘ब्लॅक स्पॉट’ दूर होणार असून, येथून थेट बोक्हारा रोडशी जोडणी होईल. स्थानिक पोलिस आणि आरटीओने कोराडी नाक्याला अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळख दिली होती. बोक्हारा रोडच्या सहा गावांमधूनही समस्येच्या निराकरणासाठी मागणी केली जात होती.
 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) 43.37 कोटी रुपयांच्या खर्चाने 1090 मीटर लांबीचा हा उड्डाणपूल उभारण्याची जबाबदारी अमरावतीस्थित ‘ग्लोबल इन्फ्राटेक प्रा. लि.’ या कंपनीला दिली आहे.
Powered By Sangraha 9.0