भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे कुटूंब केले उध्वस्त, १४ जण ठार

07 May 2025 12:54:20
 
Masood Azhar under Operation Sindoor
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली/इस्लामाबाद :
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर केंद्रित ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय वायुदलाने ६ मेच्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करत दहशतवादाच्या मुळावर घाव घातला आहे.
 
या कारवाईत जैशचा कुख्यात म्होरक्या मसूद अझहर याच्या कुटुंबातील १० सदस्यांचा अंत झाला असून, संघटनेतील ४ वरिष्ठ दहशतवादी कार्यकर्तेही ठार करण्यात आले आहेत. ठार झालेल्यांमध्ये अझहरचे भाऊ, भाचे आणि जैशसाठी प्रशिक्षण देणारे प्रमुख सदस्य असल्याचं समोर आलं आहे.
 
भारताच्या हल्ल्याचा रोख अत्यंत अचूक होता. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत, भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या मुळ दहशतवादी कारवायांवर थेट प्रहार केला. ही कारवाई केवळ इन्फ्रास्ट्रक्चरवर नव्हे, तर नेतृत्व पातळीवर मोठा धक्का मानली जात आहे.
 
दरम्यान, भारताच्या या निर्णायक कृतीनंतर पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणेच निष्पाप नागरिकांवर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, भारताने जगासमोर दिलेल्या ठोस पुराव्यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड झाला आहे.
 
‘ऑपरेशन सिंदूर’ फक्त लष्करी यश नव्हे, तर २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला दिलेलं थेट आणि प्रभावी उत्तर आहे.ही कारवाई पुन्हा एकदा सिद्ध करते की, भारत आता दहशतवाद्यांना शब्दात नव्हे, तर कृतीतून प्रत्युत्तर देतो.
Powered By Sangraha 9.0