सोन्याच्या दरात १९ हजारांची घसरण होणार का? जाणून घ्या कारणं

    03-May-2025
Total Views |
 
gold
(Image Source : Internet)
 
सोन्याचे (Gold) दर लवकरच मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. केडिया अ‍ॅडव्हायजरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांच्या म्हणण्यानुसार, आगामी चार ते सहा महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात १९ हजार रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा ९१ ते ९३ हजार रुपये आहे, पण काही आठवड्यांपूर्वीच सोनं १ लाख रुपयांपर्यंत पोहोचलं होतं.
 
हे आहेत घटाचे मुख्य कारणं-
१. जागतिक स्थिरता: अमेरिका-रशिया-युक्रेन यांच्यातील तणाव निवळल्याने जागतिक बाजारात स्थिरता येत आहे, त्यामुळे सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे.
 
२. आयात धोरणातील शिथिलता: भारताच्या आयात धोरणात झालेल्या बदलामुळे, सोन्याचे दर कमी होण्याचा अंदाज आहे.
 
३. भूराजकीय तणाव कमी होणे: युद्धाच्या स्थिती आणि तणाव कमी झाल्यामुळे सोनं आता सुरक्षित गुंतवणूक म्हणून कमी पसंत केलं जात आहे.
 
गुंतवणूकदारांसाठी सल्ला:
तज्ज्ञांचा सल्ला आहे की, सोन्याचे दर स्थिर होण्याची प्रक्रिया सुरू होईल, म्हणून सध्या खरेदी करण्याऐवजी काही काळ थांबून विचार करणं योग्य ठरू शकतं.
 
ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी-
सोन्याच्या दरात अपेक्षित घसरण ग्राहकांसाठी एक चांगली बातमी असू शकते, विशेषतः लग्नसराईच्या काळात. त्यामुळे सोनं खरेदी करायचं असल्यास, हे एक उत्तम समय ठरू शकतो.