SBI चा मोठा निर्णय: कर्जदरात कपात; लाखो ग्राहकांना EMI मध्ये दिलासा

    03-May-2025
Total Views |
 
SBI Loan rate
 (Image Source : Internet)
मुंबई :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकतीच रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सने कपात केली असून, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कर्जदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे SBI कडून गृहकर्ज किंवा MSME कर्ज घेणाऱ्या लाखो ग्राहकांना त्यांच्या EMI मध्ये थेट फायदा होणार आहे.
 
ही नवीन व्याजदर प्रणाली 15 एप्रिल 2025 पासून लागू झाली आहे. SBI ने आपल्या External Benchmark Lending Rate (EBLR) आणि Repo Linked Lending Rate (RLLR) आधारित कर्जांमध्ये 0.25% पर्यंत कपात केली आहे. मात्र, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
 
सध्याचे MCLR दर पुढीलप्रमाणे आहेत-
ओव्हरनाइट / 1 महिना: 8.20%
3 महिने: 8.55%
6 महिने: 8.90%
1 वर्ष: 9.00%
2 वर्षे: 9.05%
3 वर्षे: 9.10%
 
नवीन EBLR आणि गृहकर्ज व्याजदर:
SBI चा External Benchmark Rate (EBR) आता 8.65% इतका आहे, जो RBI चा रेपो रेट (6.00%) आणि SBI चा स्प्रेड (2.65%) यांच्या बेरीजमुळे ठरतो. हे दर मुख्यतः फ्लोटिंग रेट होम लोन आणि MSME कर्जांवर लागू होतात.
 
सध्याचे गृहकर्ज दर पुढीलप्रमाणे -
सामान्य होम लोन: 8% ते 8.95%
SBI Maxgain ओव्हरड्राफ्ट: 8.25% ते 9.15%
टॉप-अप लोन: 8.30% ते 10.80%
 
EMI मध्ये दिलासा, पण क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा-
जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर सध्याची रेपो कपात ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. कमी व्याजदरामुळे EMI चा आर्थिक भार हलका होण्याची शक्यता आहे. मात्र, लोन घेताना तुमचा क्रेडिट स्कोअर (CIBIL) तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यावरच तुमच्यासाठी लागू होणारा व्याजदर ठरतो.