सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही; अजित पवारांचे रोखठोक विधान

    03-May-2025
Total Views |
 
Ajit Pawar
 (Image Source : Internet)
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणत राजकारण करावं, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी केसी कॉलेज सभागृहात आज जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजित पवारांनी आपले मत मांडले.
 
ते म्हणाले, "आम्ही कधीही जात-पात, धर्म यांचा विचार करून राजकारण केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती आणि धर्माच्या लोकांना सोबत घेत राजकारण केलं. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्याच पद्धतीने कार्य करते." तसेच, "मी सत्तेसाठी कधीही हापापलेलो नाही. मी जीवनात सर्वाधिक सत्ता अनुभवली आहे. काही लोक सोयीच्या गोष्टी सांगत आहेत, पण आमच्या पक्षाचे आमदार हे सरकारमध्ये सामील होण्यासाठी तयार होते," अशी त्यांची स्पष्ट कबुली होती.
 
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)च्या वापरावर ते म्हणाले, "आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय काहीही करणे शक्य नाही. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे."
तसेच, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि रावेर येथील शरद पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी मंत्री सतिश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, तसेच धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील यांचा समावेश होता.