(Image Source- Internet)
नागपूर :
महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने गुरुवारी पोलिस विभागात मोठा फेरबदल केला आहे. यात २१ आयपीएस अधिकाऱ्यांचे तबादले (IPS officers transferred) करण्यात आले असून, नागपुर शहरातील डीसीपी ट्रॅफिक अर्चित चांडक यांचा अकोला पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
नागपुर ट्रॅफिक पोलिसांचे डीसीपी असलेल्या अर्चित चांडक यांना अकोला जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. तर, अकोला पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांना नागपुर SPRF मध्ये नवीन कार्यभार मिळाला आहे.
नागपुर CID चे एसपी नीलेश तांबे यांना बुलढाणा जिल्ह्याचा पोलिस अधीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच, मुंबईतील पोलीस उपयुक्त पदावर असलेले मंगेश शिंदे यांना नागपुर लोहमार्ग पोलिसांचे एसपी म्हणून नेमले गेले आहे.
विदर्भसह महाराष्ट्रातील इतरही अनेक पोलिस अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र बदलण्यात आले असून, त्यांची संपूर्ण यादी गृह विभागाने जाहीर केली आहे.