राम गोपाल वर्माची वादग्रस्त टिप्पणी; कियाराच्या फोटोवर केली अश्लील कमेंट्स

22 May 2025 14:51:11
 
Ram Gopal Varma controversial
 (Image Source- Internet)
मुंबई:
बॉलिवूडमधील चर्चित पण तितकाच वादग्रस्त दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) पुन्हा एकदा आपल्या वर्तनामुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याने अभिनेत्री कियारा आडवाणीच्या फोटोवर एक अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करत सोशल मीडियावर गोंधळ उडवून दिला आहे.
 
‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कियारा आडवाणी, ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एनटीआरच्या वाढदिवशी टीझर रिलीज करण्यात आला असून त्यातील कियाराचा बिकिनीतील एक सीन चर्चेचा विषय ठरला आहे.
 
राम गोपाल वर्माने तो फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत अश्लील आणि अपमानास्पद कमेंट लिहली. ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि त्यावरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत वर्मावर जोरदार टीका केली. वाढत्या टीकेमुळे वर्माला शेवटी ती पोस्ट हटवावी लागली. वर्माच्या अशा प्रकारच्या वर्तनावर आता सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि अनेकांनी त्याच्या अशा वागण्याचा निषेध केला आहे.
Powered By Sangraha 9.0