(Image Source : Internet)
नागपूर:
नागपूरच्या (Nagpur) वानाडोंगरी येथील स्मशानभूमीजवळ शुक्रवारी सकाळी ३४ वर्षीय नितेश नरेंद्र भोळे यांचा बेशुद्धावस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक तपासानुसार उष्माघातामुळे नितेशचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नितेश भोळे हे हिंगणा येथील संगम खैरी येथील रहिवासी होते. शुक्रवारी सकाळी ते स्मशानभूमीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने एआयआयएमएस रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नागपूरमध्ये सध्या तापमानाची लाट वाढल्याने उष्माघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अधिकृत शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा सुरू केली आहे.नितेशच्या भाऊ उमेश नरेंद्र भोळे यांच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.