(Image Source : Internet)
ज्येष्ठ अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे, “नमस्कार मित्रांनो, माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कृपया काळजी घ्या आणि मास्क वापरणं विसरू नका.
शिल्पा यांच्या या अपडेटनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्यांना विश्रांती घेण्याचा आणि लवकर बरे होण्याचा सल्ला दिला आहे.
शिल्पा शिरोडकर या हिंदीतील बिग बॉस १८ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्या शोमधील आघाडीच्या आणि लोकप्रिय स्पर्धकांमध्ये गणल्या जात होत्या.
दरम्यान, कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सोशल मीडियावरून मास्क वापरण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा जोर धरू लागले आहे.