(Image Source : Internet)
मुंबई:
शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारतीय जनता पक्षावर राजकीय सूड घेण्याचा आरोप करत जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, “मला राजकीय सूडापोटी तुरुंगात पाठवलं गेलं.
संजय राऊत यांनी अलीकडेच प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकाचा उल्लेख करत म्हणाले, “या पुस्तकात मी केवळ काही संदर्भ दिले आहेत. गेल्या ३०-३५ वर्षांत ज्या राजकीय घडामोडी घडल्या, त्यातील अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. पुस्तकात बरंच काही लिहिलं नाही, पण माझ्याकडे अजूनही अनेक बाबींची माहिती आहे.
पुढे बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा उल्लेख करत सांगितलं की, हे दोघं नेते राजकारण न पाहता मदतीसाठी पुढे येणारे होते. मात्र, त्यांचेच पक्ष पुढे फोडले गेले, ही वस्तुस्थिती आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.