भारतीय लष्कराच्या बळकटीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ५० हजार कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर होणार

    16-May-2025
Total Views |
 
Central govt
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली:
अलीकडील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या (Indian Army) मजबुतीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. संरक्षण क्षेत्रासाठी ५०,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. हा निधी केवळ शस्त्रास्त्रांच्या खरेदीपुरता मर्यादित न राहता, संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीसाठी वापरण्यात येणार आहे.
 
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने आपल्या लष्करी क्षमतेचे दर्शन घडवले. सुरक्षा दलांच्या एकत्रित कारवाईतून पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले. या मोहिमेत भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीची भूमिका विशेष ठरली.
 
सध्या युद्धविराम लागू असला तरी, सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर ठेवण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मागील काही वर्षांपासून संरक्षण खर्चात झालेली वाढ, युद्धसज्जतेच्या हालचाली आणि धोरणात्मक निर्णय यामुळे भारत अधिक आक्रमक व सक्रिय भूमिका बजावताना दिसत आहे.