(Image Source : Internet)
नागपूर:
आजच्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold prices) लक्षणीय वाढ झाली असून, गुंतवणूकदार आणि ग्राहकांच्या दृष्टीनं ही महत्त्वाची बातमी आहे. कालच्या तुलनेत आज सोनं अधिक महागलं असून, आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडींचा यावर परिणाम झाल्याचं स्पष्ट होत आहे.
सोन्याच्या दरात वाढ -
गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळणाऱ्या सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा जोरदार वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1, 200 रुपयांनी तर 22 कॅरेटमध्ये 1,100 रुपयांनी आणि 18 कॅरेटमध्ये 900 रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खर्चिक ठरणार आहे.
चांदीच्या दरात मात्र घसरण-
सोन्याच्या दरात वाढ होत असतानाच, चांदी मात्र आज स्वस्त झाली आहे. 1 किलो चांदीचा भाव 2,297 रुपयांनी घसरून 94,103 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. काल चांदीचा दर 96,400 रुपये प्रति किलो होता.
नागपूर,मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्येही आज खालीलप्रमाणे दर आहेत:
22 कॅरेट – 87,200
24 कॅरेट – 95,130
18 कॅरेट – 71,350
दरातील बदलाचं कारण काय?
अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार तणाव कमी झाल्यानं जागतिक बाजारात स्थिरता आल्याचं निरीक्षण आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पुन्हा वळण घेतलं असून, त्यामुळे दर वाढले आहेत.