नागपुरातील डिलाइट स्पामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका तर एकाला अटक

14 May 2025 21:04:13
 
Sex racket
 (Image Source : Internet)
नागपूर :
शहरातील साऊथ अंबाझरी रोडवरील डिलाइट स्पामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखा युनिट 1 ने छापा टाकून भांडाफोड केली. मंगळवारी, 13 मे रोजी दुपारी सुमारे 4.15 वाजता ही कारवाई करण्यात आली. स्पा श्रध्दानंदपेठ परिसरातील इंडियन बँकेजवळ आहे.
 
पोलिसांनी कारवाईदरम्यान रिजूल अली इस्माईल अली (वय 26, रा. सोयगाव, आसाम) याला अटक केली असून त्याचा साथीदार रहानुद्दीन सहाबुद्दीन (वय 26, रा. आसाम) हा सध्या फरार आहे. आरोपी स्पा सेंटरच्या आडून महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
या ऑपरेशनदरम्यान पाच महिलांची सुटका करण्यात आली. तसेच पोलिसांनी दोन मोबाईल फोन्स, 31,700 रुपयांची रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण 72,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
या प्रकरणी बजाज नगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत कलम 3, 4, 5 आणि 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0