(Image Source : Internet)
मुंबई :
बॉलीवूडचा 'किंग' शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपल्या आगामी सिनेमाची जोरदार चर्चा करत आहे. 'किंग' सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, आणि यावेळी त्याच्या स्टारकास्टमध्ये आणखी एक मोठं नाव समोर आलं आहे. १९९५ साली आलेल्या 'त्रिमूर्ती' सिनेमामध्ये शाहरुख खान, जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर एकत्र दिसले होते, पण त्यानंतर शाहरुख आणि अनिल कपूर एकत्र दिसले नव्हते.
मात्र, ३० वर्षांनंतर शाहरुखच्या 'किंग' सिनेमात अनिल कपूर यांची एन्ट्री झाली आहे. पिंकव्हिला रिपोर्टनुसार, अनिल कपूर सिनेमात शाहरुखचा मार्गदर्शक भूमिका निभावणार आहेत. यामुळे शाहरुख आणि अनिल कपूर यांच्या पुन्हा एकत्र दिसण्याची चाहत्यांना विशेष उत्सुकता लागली आहे.
'किंग' सिनेमात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, अभय वर्मा यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे, आणि शाहरुख आणि दीपिका रोमँटिक भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. 'किंग' सिनेमाची शूटिंग सुरू असून, याची मुंबई शेड्यूल २० मे पासून सुरू होणार आहे, आणि त्यानंतर युरोपमध्ये काही भागांचे शूट होणार आहे.
सिनेमा पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात रिलीज होईल, अशी माहिती मिळाली आहे. शाहरुख आणि अनिल कपूरच्या ३० वर्षांनी पुन्हा एकत्र होणारी जोडी चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाचा क्षण ठरणार आहे.