रामटेकमध्ये रेती तस्करीवर धडक कारवाई, ६ जणांना अटक,१.७७ कोटींचा मुद्देमाल जप्त

09 Apr 2025 17:30:57
 
sand smuggling
 (Image Source : Internet)
नागपूर :
रामटेक तालुक्यात अवैध रेती तस्करीविरोधात (Sand smuggling) प्रशासनाने कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई पार पडली असून, त्यात ६ आरोपींना अटक करण्यात आली असून १ कोटी ७७ लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
ही कारवाई रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक पोलीस आणि अरोली पोलीस यांच्या संयुक्त पथकाने केली. रामटेक-तुमसर मार्ग, नागपूर-जबलपूर रोड आणि खात-घोटमुंढरी रोडवर तस्करीची माहिती मिळाल्यानंतर छापेमारी करण्यात आली.
 
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ऋषी वैरागडे, शुभम रडके, शिवशंकर कुमार, निकेश पारखी, अशफाक युसुफ खान, साकिब रजा खान, आशीष प्रकाश कनपटे, किशोर चकोले आणि अनिल राऊत यांचा समावेश आहे. या सर्वांवर महसूल विभाग आणि भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0