अबू आझमी ही औरंगजेबाची छटी औलाद ; शिवसेना नेते संजय शिरसाटांचा घणाघात

08 Apr 2025 16:44:40
 
Sanjay Shirsat slams Abu Azmi
 (Image Source : Internet)
मुंबई :
अबू आझमी (Abu Azmi) ही औरंगजेबाची छटी औलाद आहे, असे खळबळजनक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केले. औरंगजेबावर प्रेम करणाऱ्या अबू आझमींनी त्याची कबर उचलून आपल्या घरी न्यावी, असा टोला त्यांनी लगावला.
 
ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर, मंदिरांवर आणि महिलांवर अत्याचार केले, अशा औरंगजेबाची कुठलीही निशाणी महाराष्ट्रात सहन केली जाणार नाही, असं म्हणत त्यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
 
याच पार्श्वभूमीवर त्यांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरावरही निशाणा साधला. लोकांचे कपडे उतरवण्याची भाषा करणाऱ्या कुणाल कामराला कोणाची भीती वाटते? तो गद्दार म्हणतो, देशद्रोहाचे वक्तव्य करतो. कामरा मुंबईत आला तर त्याला तसंच उत्तर दिलं जाईल. त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा थेट इशारा शिरसाटांनी दिला.कुणाल कामराला कायद्याच्या चौकटीत नक्कीच शिक्षा होईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0