‘लाज वाटत नाही का? गिरीश महाजन यांचा खडसेंना थेट इशारा, राजकीय वातावरण तापले

07 Apr 2025 14:01:43
 
Girish Mahajan Eknath Khadse
 (Image Source : Internet)
मुंबई :
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका करत थेट इशारा दिला आहे. महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप खडसे यांनी महाजन यांच्यावर केला होता. या आरोपांवर महाजनांनी कडाडून प्रत्युत्तर दिले आहे.
 
महाजन यांचा संतप्त प्रतिउत्तर-
गिरीश महाजन म्हणाले, “मी जर खडसेंविषयी एक गोष्ट उघड केली, तर ते घराबाहेरही पडू शकणार नाहीत. लोक त्यांना जोड्याने मारतील. पण मी इतकं खालचं वागणार नाही. अजून जर काही बोलले, तर मला तोंड उघडावं लागेल. मी संयम बाळगतोय, पण हे सत्य बाहेर आलं, तर खडसेंना तोंड काळं करून फिरावं लागेल.”ते पुढे म्हणाले, “फक्त बोलून चालत नाही, काही पुरावे द्या. जर आरोपांमध्ये तथ्य असेल, तर ते स्पष्ट करा. खोटं बोलणाऱ्याला लाज वाटायला हवी. लोकांना गृहित धरू नका.
 
खडसेंचा आरोप नेमका काय होता?
एका पत्रकाराच्या हवाल्याने खडसे यांनी असा दावा केला होता की, “गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत. याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही आहे. शाह यांनी स्वतः एका बैठकीत महाजन यांना याबाबत विचारणा केली होती.”या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा खळबळ उडाली असून, भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. महाजन-खडसे वाद पुढे काय वळण घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0